Kalyan Crime News : दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी म्हण आपण नेहमीच ऐकतो. मात्र दोघांच्या भांडणात तिसऱ्यालाच त्रास झाल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे.  नवरा बायकोचं भांडण सोडवायला गेलेल्या पोलिसालाच शिक्षा मिळाली आहे. भांडण सोडवताना पोलिसालाच चावा घेण्यात आला आहे. या पोलिसाच्या हाताला आणि डोक्याला जखम झाली आहे (Kalyan Crime News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोळशेवाडी पोलिसांनी या प्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.  दोन पोलिस पती-पत्नीचे भांडण सोडवायला गेले होते.  पोलिसाला मारहाण करत चावा घेण्यात आला आहे.  यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 


कल्याण पूर्व येथील विजय नगर परिसरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी महेश माने नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश माने याचे पत्निसोबत वाद झाले होते. याबाबत कोळशेवाडी पोलीस ठाण्याला पोलीस नियंत्रण कक्षातून माहिती मिळाली. 


कोळशेवाडी पोलीस ठाण्याचे नागेशनाथ घुगे आणि हवालदार सांगळे हे दोघे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या महेश बने यांनी या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुकी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.


महेश इथेच थांबला नाही तर त्याने घुगे यांच्या हाताला आणि डोक्याला चावा घेतला. अखेर पोलीस कुमक मागवत महेश याला ताब्यात घेण्यात आले. महेश विरोधात मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे.


कल्याणमध्ये वाहनांची तोडफोड


कल्याणमध्ये रस्त्यालगत उभ्या असलेल्या पाच ते सहा कार आणि रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे. कल्याण पूर्व येथील विठ्ठल मंदिर परिसरात ही वाहनांची तोडफोड झाली आहे. दहशत मजवण्याच्या उद्देशाने हे कृत्य करण्यात आल्याचे बोलले जात आहे. जयदीप डोईफोडे याने दहशत माजवण्याच्या उद्देशाने दांडके आणि तीक्ष्ण हत्याराने वाहनांची तोडफोड केली . या प्रकरणी पोलिसांनी जयदीप उर्फ टक्या याला अटक केली आहे. जयदीप सोबत असलेल्या त्याच्या एका साथीदाराला देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे.