Jalna Crime News :  जालना येथे कॉफी सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात होते. या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. या प्रकरणी हे कॅफे चालवणाऱ्या दोघांना अटक केली आहे. भरवस्तीत अशा प्रकारचे कृत्य सुरु असल्याने खळबळ उडाली आहे. सध्या पोलिस सर्व कॅफेंची कसून चौकशी करत आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन जालना भागातील आझाद मैदान भागात असलेल्या थिंकिंग कॅफे या कॉफी सेंटरमध्ये पोलिसांनी अचानक धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी 5 महाविद्यालयालयीन जोडप्यांना अश्लील चाळे करताना पकडले. पकडलेले पाचही जोडपे हे महाविद्यालयीन तरुण -तरुणी आहेत. या दुकानात कॉफी सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालविल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीवरुनच पोलिसांनी ही धाड टाकली. या कॅफेचा चालक या ठिकाणी येणाऱ्या जोडप्याकडून एक तासाचे 500 रुपये घेत असल्याची माहीती उघडकिस आली आहे. पोलिसांनी कॉफी शॉपच्या 2 चालकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.तर 5 जोडप्यांना ताब्यात घेऊन सोडण्यात आलं आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.


फेसबुकवर फ्रेंडशिप करुन घातला गंडा


फेसबुक वरून मैत्री करून रेल्वेत सरकारी नोकरी लावून देतो अस आमिष देऊन फसवणूक करणाऱ्या तिघांना कासा पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी दीपक किशोर दर्शन राहणार बोईसर हा फेसबुकच्या माध्यमातून तरुण-तरुणींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याशी मैत्री करत असे . त्यानंतर काही दिवसात आरोपी त्याच्या इतर साथीदारांसह फेसबुक वर मैत्री केलेल्या तरुण-तरुणींना तुम्हाला रेल्वे विभागात नोकरी लावून देतो असं आमिष देऊन त्यांच्याकडून लाखो रुपये उकळत असे. योगिता चौधरी हिच्या सह पालघर मधील आणखी तिघांनी या आरोपींना प्रत्येकी चार लाख रुपये दिल्याची साक्ष कासा पोलीस ठाण्यात दिली आहे . आरोपीकडून वारंवार उडवा उडवीची मिळणारी उत्तरं आणि त्या नंतर काही दिवसांनी आरोपीचा फोन बंद झाल्याने योगिता चौधरी हिने कासा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती . कासा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या कलम 420, 406 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून सापळा रचून कासा पोलिसांनी मुख्य आरोपी दीपक कीशोर दर्शन याला नाशिक मधून तर विवेक कुमार कैलास चंद्र आणि राहुल प्यारेलाल पाल या दोघांना उत्तर प्रदेशातून अटक केली आहे .