dombivli crime news :  डोंबिवली येथील खाजगी रुग्णालयात एक धक्कादा.यक प्रकार घडला आहे.  रुग्णलयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करत त्याचा चावा घेतला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी डोंबिवली मानपाडा पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. राज सिंह यांच्या पत्नी ज्योती सिंह यांच्या पोटात दुखत होते. त्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीला डोंबिवली पूर्वेतील खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी ज्योती यांना रुग्णालयात दाखल करून घेतले. तसेच सिटीस्कॅन आणि इतर टेस्ट करण्यास सांगीतले. डॉक्टरांनी टेस्ट करण्यास सांगितल्याने ज्योतीचे पती राज आणी सासू सुशील यांनी डॉक्टरांशी वाद घातला. हा वाद वाढून त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर ज्योती यांच्या नातेवाईकांनी डॉक्टर आणि त्यांच्या दोन कर्मचाऱ्यांना चावा घेतला. या प्रकरणी डॉक्टराच्या तक्रारी वरून मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रिक्षा चालकाचा दुचाकीस्वारावर लोखंडी रॉडने हल्ला


डोंबिवलीत एका रिक्षा चालकाने दुचाकीस्वारावर लोखंडी रॉडने हल्ला केला. दुचाकीस्वाराने गाडीला पाठीमागून धक्का का दिला याचा जाब विचारला असता रिक्षाचालकाने त्याला मारहाण केली. या हल्ल्यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय. याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय.


वेश्या व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी केले 4 वर्षाच्या मुलाचे अपहरण 


डोंबिवलीत वेश्या व्यवसायातून बाहेर पडण्यासाठी एका बांगलादेशी अल्पवयीन मुलीने 4 वर्षाच्या मुलाचे अपहरण केलं. मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपहरण करणा-या मुलीचा शोध घेत मुलाला सुखरूप त्याच्या आईच्या स्वाधीन केलं. गारमेंट कंपनीमध्ये कामाला लावतो असे आमिष दाखवत मुलाला आरोपीनी बांग्लादेश्यातून डोंबिवलीत आणले होतं. याप्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय..


डोंबिवलीत घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी


डोंबिवलीत घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी करणा-या टोळीला अटक करण्यात आलीये. मानपाडा पोलिसांनी ही कारवाई केली. ही टोळी घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरी करून तो गॅस व्यावसायिक सिलेंडरमध्ये भरायची. अधिक नफा मिळवण्यासाठी या टोळीने गेल्या अनेक दिवसांपासून गॅस चोरीचा धंदा सुरू केला होता.


कल्याण डोंबिवलीच्या मार्केट परिसरात  फेरीवाल्यांवर कारवाई


कल्याण डोंबिवलीच्या मार्केट परिसरात पालिकेने फेरीवाल्यांवर कारवाई केली... या कारावाई विरोधात फेरीवाले आक्रमक झाले. फेरीवाल्यांचं सामान जमिनीवर खाली टाकण्यात आल्यामुळे संबंधित अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा फेरीवाल्यांनी दिलाय.