विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : लव्ह जिहाद(love jihad ) प्रकरणात अनेक मुस्लिम मुलांनी हिंदू मुलींना लग्नासाठी मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याच्या घटना महाराष्ट्रात सतत्याने घडत आहेत. मात्र, संभाजीनगर अर्थात औरंगाबादमध्ये(Sambhijinagar) एक वेगळंच प्रकरण उघडकीस आले आहे. लग्नापूर्वी मुस्लीम धर्म स्वीकारण्यासाठी तरूणाला मुलीच्या कुटुंबियांनी बेदम मारहाण करत त्याचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.


मुलीच्या घरच्यांनी लग्नासाठी मुलाला  मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल अशी अट घातली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक सोनवणे असे या मारहाणीला आणि छळाला बळी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. दीपक संभाजीनगरमध्ये राहतो.  बीई मेकॅनिकल इंजिनीअरचे शिक्षण घेत असताना  2018 मध्ये त्याच्यासोबत शिकणाऱ्या एका मुस्लिम तरुणीशी त्याची ओळख झाली होती,  यातून दोघांचं प्रेम झालं. 2020 - 21 दरम्यान त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला. मात्र, मुलीच्या घरच्यांनी याबाबत मुलाला मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल अशी अट घातली.


मुलाने मुस्लीम धर्म स्वीकारण्यास नकार दिला


मुलाने मुस्लीम धर्म स्वीकारण्यास नकार दिला. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी अतोनात छळ सुरू केल्याचा आरोप या तरुणाने केला. त्याला त्याच्या घरातून उचलून नेत दोन दिवस  डांबून ठेवले, मुलीच्या वडिलांनी अतोनात मारले,  इतकच नाही तर मुलाच्या कुटुंबीयांचाही छळ केला. मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून  खोट्या तक्रारी पोलिसात देऊन आम्हाला जेलमध्ये सुद्धा टाकलं असल्याचा आरोप या मुलाना केलेला आहे. 


आतापर्यंत या मुस्लिम कुटुंबीयांनी मुलाकडून 11 लाख रुपये उकळल्याच या मुलाचं म्हणणं आहे.  इतंकच नाही तर मुस्लिम धर्म स्वीकारून बळजबरीने सुंता केल्याचाही आरोप या मुलांना केला आहे. याबाबत त्याने पोलिसात तक्रार सुद्धा दिली असल्याच त्याच म्हणणं आहे. महत्त्वाचं म्हणजे यात संभाजीनगरचे खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप या पीडित मुलाने केला आहे.


या संपूर्ण प्रकरणाची गंभीर्याने दखल घेत भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. हा प्रकार गंभीर आहे आणि याच्यावर कारवाईची मागणी भाजपच्या शिष्ट मंडळांना केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या शिष्टमंडळात राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे सुद्धा होते. या संपूर्ण प्रकरणात एसीपी दर्जाचा अधिकारी आता चौकशी करत असल्याचं पोलीस आयुक्तांचे म्हणणं आहे. चौकशीच्या अहवालानंतरच यात काय तथ्य आहे हे सांगता येईल असं पोलिसांनी सांगितले.