अरे व्वा, मस्तच ! शिक्षकाचा असा जुगाड लयभारी, कल्पनाशक्तीला मिळतेय दाद
Teacher created a four-tiered trolley : संपामुळे अनेक ठिकाणी एसटी सेवा बंद आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती वाढत असल्याने या नव्या जुगाडाचे कौतुक होत आहे.
वाल्मीक जोशी / जळगाव : Teacher created a four-tiered trolley : आपल्या कल्पनाशक्तीने एक शिक्षकाने विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी 10 क्विंटल वजन ओढू शकेल अशी चार टायरची ट्रॉली बनविली. एसटी कर्मचारी संपामुळे अनेक ठिकाणी एसटी सेवा बंद आहे. तर पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती वाढत असल्याने या नव्या जुगाडाचे कौतुक होत आहे.
एक मोटर सायकल. या बाईकला ट्रॉली जोडणी करण्याची सोय केली. जानेवारी महिन्यापासून शाळा उघडल्यापासून ते रोज 10 ते 12 विद्यार्थ्यांना बसवून पारोळा येथे नियमित शिकवणी आणि शाळेच्या कामासाठी सोडतात. संध्याकाळी परत त्यांना घरी सोडतात.
एसटी संपामुळे शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता जळगावातील पारोळा येथील शिक्षकाने भन्नाट संकल्पना साकारली असून विध्याथ्याना ने आण करण्यासाठी मोटारसायकलला ट्रॉली जोडली आहे. शिक्षक एम. व्ही. पाटील मुलांना शाळेत नेतात. आधी कोरोनामुळे बस बंद , आता एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसेस बंद यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे . विध्याथ्याचे नुकसान होऊ नये याकरिता त्यावर टेहू येथील आयटीआयचे शिक्षक एम . व्ही पाटील यांनी उपाय शोधून काढला आहे आपल्या मोटारसायकलला ट्रॉली जोडून ते विनामूल्य विद्यार्थ्यांना शाळेत नेतात.
बस बंदमुळे शहरी शिक्षणासाठी ये - जा करणाऱ्या लाखो भागात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ज्या पालकांकडे वाहन आहे , ते मुलांना शाळेत नियमित पाठविण्याचा प्रयत्न करतात मात्र ग्रामीण भागातील मुल शिक्षणापासून वंचित राहू नये, या करिता शिक्षक एम. व्ही. पाटील हे दगडीसबगव्हाण ते टेहू रोज मोटारसायकलने प्रवास करतात. त्यांना वाहनाची वाट पाहणारे अनेक विद्यार्थी रस्त्याच्या कडेला उभे असलेले दिसायचे ते पाहून पाटील यांना कल्पना सूचली त्यांनी ही चार टायरची ट्रॉली बनविली.