जे घडायचं ते घडतचं! `तो` शेवटपर्यंत हॉपिस्टलमध्ये पोहचलाच नाही... अपघातामागची भयानक कहाणी
मृतांमध्ये रुग्णवाहिकेतील एका व्यक्तीचा समावेश आहे. याला रुग्णालायत उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे.
गजानन देखमुख, झी मीडिया, हिंगोली : शेवटी जे घडायचं ते घडतचं.... हा वाक्यप्रचार खरा ठरवणारा थरार प्रसंग हिंगोलीत( Hingoli) घडला आहे. हिंगोली जिल्ह्यात रुग्णवाहिका आणि ट्रकचा भीषण अपघात(terrible accident ) झाला. या अपघातात दोघे जण ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये रुग्णवाहिकेतील एका व्यक्तीचा समावेश आहे. याला रुग्णालायत उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला आहे.
हिंगोली जिल्ह्यातील डोंगरकडा ते नांदेड मार्गावर हिवरा पाटीजवळ हा अपघात झाला. रुग्णवाहिका आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला. ट्रके रुग्णवाहिकेला धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून यातील एक जण रुग्णवाहिकेतील आहे.
या मृत व्यक्ती अपघतात जखमी झाला होता. त्याला याच रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले जात होते. मात्र, या रुग्णवाहिकेचाच भीषण अपघात झाला. रुग्णवाहिकेतील जखमी रुग्णाचाच उपचाराआधीच पुन्हा एकदा अपघात होऊन मृत्यू झाला.
या अपघातात अन्य पाच जण जखमी झाले असून जखमीपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या अपघातामुळे हिवरा व डोंगरकडा गावावर शोकळा पसरली असून इतर जखमींवर नांदेड येथे उपचार सुरू आहेत.