प्रथमेश तावडे, झी मीडिया, नालासोपरा, Mumbai Crime: सध्या चोरीच्या घटना सगळीकडेच वाढू लागल्या (Crime news in Nalasopara) आहेत. त्यामुळे सगळीकडेच योग्य ती खबरदारी घेणं आवश्यक झालं आहे. नालासोपाऱ्यात असाच एक धक्कादायक प्रकार (Shocking News) घडला आहे. एका चोरट्यानं चक्क तृतीय पंथांच्या (transgeneder) घरातील लाखो रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे आणि त्यासाठी त्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. नालासोपाऱ्यात (Nalasopara News) एका तृतीय पंथ्याच्या घरात लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्याला तुळींज पोलिसांनी अवघ्या 24 तासात अटक करण्यात यश आले आहे. राहुल गाथाडे असं या आरोपीचे नाव असून त्याने नालासोपारा पूर्वेकडील मोरेगाव नालेश्वर नगर परिसरातीलचं एका तृतीय पंथ्याच्या घरी नऊ तोळे सोन्याचे दागिने (Jewellery) व रोख रक्कम असा लाखो रुपयांचा ऐवज चोरला होता. (A thief who stole lakhs of rupees from a transgender house in Nalasopara was arrested by Tulinj police crime news marathi) 


काय घडलं नेमकं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुळींज पोलीस ठाण्यात या चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक बाबी व गुप्त बातमीदाराच्या मदतीने चोरट्याला अटक केली आहे..नालासोपारा वसई विरार (Vasai Virar) परिसरात दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. पोलीस या चोरट्यांची धरपकड करीत आहेत मात्र नागरिकांनीही आपले दागिने व पैसे (Money) सुरक्षित अश्या ठिकाणी ठेवावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. 


गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागले आहे - 


अशा घटना वारंवार घडत असल्यानं त्यांच्यावर आळा घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्या गुन्हेगारी फार वाढते आहे सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्यभरात ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनद्वारे खंडणी मागणाऱ्या मास्टरमाइंड आरोपीच्या दत्तवाडी पोलिसांनी राजस्थान मधून मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या धमकीने एका तरुणाने (Young Person) इमारतीवरून उडी मारली होती.अन्वर सुबान खान (वय - 29, रा. गुरूगोठडी, ता. लक्ष्मनगढ, जि. अलवर, राज्य-राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे.फिर्यादी तरुणाला इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagram) त्यांच्या 19 वर्षीय लहान भावाचा अर्धनग्न फोटो पाठविण्यात आला होता. तो फोटो, व्हिडीओचा स्क्रिनशॉट पाहिल्यानंतर लगेच आरोपीने तो डिलीट केला. 


त्यानंतर तक्रारदाराच्या भावाच्या मैत्रीणीने (Friend) फोन केला. त्यांच्या भावाला कोणीतरी इन्स्टाग्रामवरून न्युूड व्हिडीओ कॉल करून, ब्लॅकमेल करीत साडे चार हजार रुपये उकळल्याचे सांगितले. मात्र, तरीही आरोपीने संबंधित तरुणाला पैसे मागितले. बदनामीला कंटाळून तरुणाने 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकाने तांत्रीक विश्लेषण करून आरोपीची माहिती काढून अटक केले.