Hingoli Crime : हिंगोलीत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने मोक्ष प्राप्तीसाठी जिवंतपणीत आपल्या मृत्यूची तयारी केली. जिवंत व्यक्तीला अंतिम निरोप देण्यासाठी गाव गोळा झाला. वृद्धांने  मरणाची वेळ सांगितली. यानंतर नातेवाईकांनी निरोपाची तयारी केली. वेळ देखील घोषीत केली. मात्र, ऐनवेळी भलतचं काही तर घडलं. विशेष म्हणजे येथे पोलिस देखील उपस्थित होते. हिंगोलीत खुलेआम अंधश्रद्धेचा बाजार मांडला जात आहे. 


नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंगोली जिल्ह्यातील लिंबी गावात अंधश्रद्धेचा बाजा पहायला मिळाला. लिंबी गावात राहणाऱ्या एका 75 वर्षोय वृद्ध व्यक्तीने आपल्या मृत्यूची वेळ कुटुंबियांना सांगितली आणि त्यानंतर गावात अक्षरशहा अंधश्रद्धेचा बाजार मांडला.  हिंगोली तालुक्यातील लिंबी येथील धोंडबाराव देवकते हे धार्मिक वृत्तीचे असून ते नेहमीच खरं बोलत असतात असा दावा गावकऱ्यांनी केले आहे.


गजानन महाराजांच्या प्रकट दिनी  मोक्ष मिळणार 


आपल्याला साक्षात्कार झाला असून गजानन महाराजांच्या प्रकट दिनी दुपारी 2 वाजून 54 मिनिटांनी मला मोक्ष मिळणार आहे असा दावा धोंडबाराव देवकते यांनी केला. माझ्या मरणाची तयारी करा,नातेवाईकांना बोलावून घ्या, भजन कीर्तन फराळ पाण्याची सोय करा असे देवकते यांनी त्यांच्या परिवाराला सांगितले होते. 


वडिल जिवंत असतानाच मुलाने केली त्यांच्या निरोपाची तयारी केली पण... 


धोंडबाराव देवकते यांच्या मुलाने त्यांना निरोप देण्यासाठी सगळी तयारी आज केली होती. सर्व नातेवाईकांना बोलावून घेतलं. लिंबी गावात त्यांना निरोप देण्यासाठी भजनी मंडळी, नातेवाईक यांना बोलवून घेतलेय पंचक्रोशीतील नागरिकांना देखील बोलावून घेतले.  सकाळ पासूनच विना, पेटी, टाळ मृदुंग लाऊन भजन सुरू होते. मोठ्या प्रमाणात येथे परिसरातील नागरिक ही जमले असून पोलिसांनी ही उपस्थिती लावली.  2 वाजून 54 मिनिटं होऊन गेल्यावर देवकते यांनीं 4 वाजून 57 मिनिटांना मी देह सोडणार आहे असे दावा केला होता. पण दिलेली दुसरी ही वेळ निघून गेली असून धोंडबाराव देवकते यांचा साक्षात्कार फोल ठरलाय. देवकते यांचे नातेवाईक आणि गावकऱ्यांनी या माध्यमातून निव्वळ अंधश्रद्धेचा बाजार मांडल्याचे समोर आले.