Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : शिवसेना आमदार अपात्रता सुनावणीत खळबळजनक खुलासा समोर आला आहे. उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या बैठकीचा हजेरीपट कळीचा मुद्दा ठरला आहे. शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे आणि योगेश कदम यांची  उलट तपासणी घेण्यात आली. यावेळी धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात एकनाथ शिंदे हटावसाठी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीच्या हजेरीपटावर शिंदे गटात गेलेल्या 23 आमदारांनीच सह्या केल्याचं समोर आले. मात्र, या सह्या बोगस असल्याचा दावा शिंदे गटाच्या आमदारांकडून करण्यात आलाय. या सह्या आधीच घेण्यात आल्याचा दावा दिलीप लांडे यांनी केला. तर, ही सही आपली नसल्याचा दावा योगेश कदम यांनी केला. सूरत आणि गुवाहाटी येथे गेला होता का?, हॉटेलचे भाडे भाजपने भरले का? असे सवालही ठाकरे गटाने यावेळी शिंदे गटाच्या आमदारांना केले.


शिवसेना पक्षाचे मुख्य नेते हे एकनाथ शिंदेच असल्याचा दावा


शिवसेना पक्षाचे मुख्य नेते हे एकनाथ शिंदेच असल्याचा दावा आमदार अपात्रता सुनावणीत करण्यात आलाय.. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळेंची आज उलटतपासणी झाली, तेव्हा शेवाळेंनी हा दावा केला. 18 जुलै 2022 रोजी एकनाथ शिंदेंची मुख्य नेता म्हणून निवड करण्यात आल्याचं शेवाळेंनी उलटतपासणीत म्हटलंय. दरम्यान शेवाळेंची उर्वरित उलटतपासणी मंगळवारी होणार आहे. त,र सोमवारी मंत्री दीपक केसरकरांची उलटतपासणी होईल.


12-12 तास ओव्हरटाइम करण्याची वेळ नार्वेकरांवर आलीय


विधिमंडळ अधिवेशन काळात विधानसभा अध्यक्षांचा दैनंदिन कार्यक्रम अत्यंत बिझी असतो. त्यात आता आमदार अपात्रता सुनावणीची भर पडलीय. याबाबत 31 डिसेंबरच्या आत निकाल द्यावा, असा आदेश सुप्रीम कोर्टानं नार्वेकरांना दिलाय. ही डेडलाईन जवळ येऊ लागल्यानं आता दिवसाचे 12-12 तास ओव्हरटाइम करण्याची वेळ नार्वेकरांवर आलीय. 


आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटानं वारंवार केला. त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात दादही मागितली. आता कोर्टानंच राहुल नार्वेकरांना 31 डिसेंबरची डेडलाईन ठरवून दिलीय.त्याआधी हा निकाल द्यायचा असल्यानं नार्वेकरांची कसोटी पणाला लागेलय. 


'या' आमदारांवर टांगती तलवार


  1. एकनाथ शिंदे

  2. अब्दुल सत्तार

  3. संदीपान भुमरे

  4. संजय शिरसाट

  5. तानाजी सावंत

  6. यामिनी जाधव

  7. चिमणराव पाटील

  8. भरत गोगावले

  9. लता सोनवणे

  10. प्रकाश सुर्वे

  11. बालाजी किणीकर

  12. अनिल बाबर

  13. महेश शिंदे

  14. संजय रायमूलकर

  15. रमेश बोरणारे

  16. बालाजी कल्याणकर