पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाचा अनुभव नेहमीच सर्वसामान्य नागरीकांना येतो. मात्र, नागपुरमधील संताप जनक व्हिडिओ व्हायरल (Nagpur Viral Video) झाला आहे. या व्हिडओमध्ये कर्मचाऱ्यांनी नुसता कामचुकार पणाच केला नाही तर हलर्जीपणाचा कळस देखील गाठला आहे. ऑन ड्यूटी असताना ऑफिसमध्येच या कर्मचाऱ्यांचा कॅरमचा डाव रंगल्याचे व्हिडिओत दिसत आहेत. तर अनेक जण ताटकळत थांबले आहेत. हे सर्व वृद्ध नागरिक आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूरच्या भांडे प्लॉट येथील भविष्य निर्वाह निधी संगठनच्या क्षेत्रीय कार्यालयातील (Provident Fund Organization Office) हा व्हिडिओ आहे.  हयात प्रमाणपत्र जमा करण्यासाठी कर्मचारी भविष्य निधी संगठन कार्यालयात वयोवृद्धांची गर्दी होत आहे. दुसरीकडे मात्र कार्यालयातील कर्मचारी  कॅरम खेळण्यात व्यस्त असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. 


वयोवृद्ध पेन्शनधारक प्रमाणपत्र जमा करण्यातसाठी कसेबसे कार्यालयात पोहोचत आहेत. पण, त्यांना तासनतास रांगेत ताटकळ रहावे लागत आहे. ईपीएफओ कार्यालयातील कर्मचारी त्यांना सहकार्य करण्याऐवजी कॅरम खेळण्यात वेळ घालवताना दिसत आहेत. 


वयोवृद्ध पेन्शनधारक रांगा लावून बसले असताना कर्मचारी कॅरम खेळण्यात व्यस्त असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.  हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वीचा आहे. हा व्हिडिओ वरिष्ठांना मिळाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.