कोल्हापूर : पूरग्रस्तांसाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या मोठ्याप्रमाणावरील मदतीचे संकलन महासैनिक हॉलमध्ये होत आहे. या ठिकाणी मदत जमा केली जाते, त्याचे वर्गीकरण केले जाते आणि अन्नधान्यापासून ३२ प्रकारचे साहित्य एका पोत्यात भरले जाते. हे साहित्य थेट पूरग्रस्तांच्या घरापर्यंत पोहोचवले जात आहे. कोल्हापूरातील विविध स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन ही सगळी यंत्रणा उभारली आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


सांगलीतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर


कृष्णेला आलेला पूर ओसरल्यानंतर सांगलीतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. ज्या भागात पाणी होते आणि घरदार, मंदिरं पाण्याखाली होती तिथे पूराच्या वेळेचं चित्र आणि आताचे चित्र यात जमीन आस्मानाचा फरक आहे. अशाच वाळवा पेठ ते हाळभाग पूर्णपणे वेगळा दिसत आहे.



सातारा, सांगलीत का पूर आला?


सातारा, सांगलीमध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्याला मुख्य कारण म्हणजे ऑगस्ट महिन्यचा १ तारखेपासून कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेला मुसळधार पाऊस. या ऑगस्ट महिन्याच्या १० दिवसात तब्बल ३ हजार मिलीमीटर पाऊस एवढ्या प्रचंड पावसाची नोंद महाबळेश्वर भागात झाली.तर जुलै आणि ऑगस्ट या पंधरा दिवसात म्हणजेच अवघ्या दीड महिन्यात ६ हजार मिलीमीटर पावसाची नोंद महाबळेश्वरच्या भारतीय हवामान विभागात झाली आहे.