Crime News: मुंबईत (Mumbai) एका 64 वर्षीय व्यावसायिकाला हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्याला लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी व्यावसायिकाकडून आधीच 3 कोटी रुपये उकळले होते. पण यानंतर ते सतत व्यावसायिकाकडे आणखी पैसे देण्याची मागणी करत होते. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने आपल्या हाताला कोंबड्याचं रक्त लावून घेतलं होतं. व्यावसायिकाने आपल्यावर बलात्काराचा प्रयत्न केला असता, स्वत:ला वाचवण्याच्या नादात आपण जखमी झाल्याचा बनाव आरोपी महिलेने केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोनिका भार्गव उर्फ सपना चौधरी असं या आरोपी महिलेचं नाव आहे. या गुन्ह्यात तिच्यासह अन्य तीन आरोपीही सहभागी होते. त्यांची नावं अनिल चौधरी उर्फ आकाश लुबना, वजीर उर्फ सपना आणि ज्वेलर मनीश चोढी अशी आहेत. या सर्वांनी मिळून हा गंडा घातला होता. 


व्यावसायिकाने आरोपींना तीन कोटी दिले होते. पण यानंतरही आरोपींची हाव संपत नव्हती. ते आणखी पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न करत होते. यानंतर व्यावसायिकाने नोव्हेंबर 2021 मध्ये पोलिसांनी संपर्क साधत तक्रार केली. पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. 


मित्राने बनवला बलात्काराचा व्हिडीओ


अनिल आणि सपना यांनी 2017 मध्ये व्यावसायिकाशी संपर्क साधला होता. यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. त्यांना व्यावसायिकाडे खूप पैसा असल्याची माहिती होती. यानंतर त्यांनी व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात ओढण्याचा कट आखला. 


2019 मध्ये व्यावसायिक कामानिमित्त कोल्हापूरहून मुंबईला आला होता. यावेळी ते एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले होते. मोनिकाचा आरोप होती की, व्यावसियाकाने आपल्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. सपनाने या सगळ्याचा व्हिडीओही शूट केला होता. व्हिडीओत व्यावसायिक आपल्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे असं दाखवण्याचा प्रयत्न सपनाने केला होता. या व्हिडीओच्या सहाय्याने व्यावसयिकाला ब्लॅकमेल करत 3 कोटी रुपये उकळले होते. 


कोंबड्याच्या रक्ताचा वापर


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्यावर जबरदस्ती करण्यात आली असा महिलेचा दावा होता. व्यावसायिकाने जबरदस्ती केल्याने आपण जखमी झालो आणि हातातून रक्त वाहू लागलं असा महिलेचा दावा होता. पण तपासादरम्यान हे रक्त महिलेचं नाही असं स्पष्ट झालं होतं. 


आरोपी महिलेने आधीच कोंबड्याच्या रक्ताची सोय करुन ठेवली होती. तिने कोंबड्याचं ते रक्त आपल्या हातावर टाकून जखमी झालो असं दाखवण्याचा प्रयत्न केला होता. व्यावसायिकाने केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी कठोरपणे तपास केला आणि सर्व आरोपींना अटक केली.