प्रथमेश तावडे, झी मीडिया, नालासोपरा: नालासोपारा पूर्वेच्या एव्हर शाईन परिसरातील उघड्या गटारात पडून 25 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ऋषभ सरकार असं या तरुणाचे नाव असून या अपघाती मृत्यूची नोंद आचोळे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. एव्हर शाईन परिसरातील पार्वती अपार्टमेंट (Parwati Apartment) मध्ये राहणारा ऋषभ कामानिमित्त सोमवारी दुपारी बाहेर गेला होता. रात्री घरी परतत असताना इमारतीच्या बाजूलाच असलेल्या फूटपाथवर (Footpath) चालत असताना अंधारात तोल जाऊन तो गटारात पडला (Gutter) आणि त्याचा बडून मृत्यू झाला. ऋषभ हा आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा (Son) होता. तो जानेवारी महिन्यात परदेशात नोकरीसाठी (Aboard Job) जाणार होता. मात्र वडिलांना कर्करोग असल्याने त्यांच्या उपचारासाठी तो घरातून काम करत होता. पण त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. (a young man died after falling into a drain while walking on the road) 


परदेशात जाण्याचे स्वप्न राहिलं अधुरं : 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परदेशात जाण्यासाठी ऋषभनं पुर्ण तयारी केली होती. त्यासाठी तो काही महिन्यातच परदेशात जाणार होता. जानेवारीत तो परदेशात जाणार होता. त्यामुळे त्याचं स्वप्न हे अधुरचं राहिलं. सध्या या घटनेनं सगळीकडे हाहाकार माजवला आहे. यामुळे ऋषभच्या घरच्यांनाही जबर धक्का बसला आहे. सध्या या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या (Municipal) कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पालिकेने पावसाळ्यात सर्व उघडी गटारे बंदिस्त केल्याचा दावा केला होता. मात्र सलग महिनाभरात दोन जणांना उघड्या गटारात आपला जीव गमवावा लागला असल्याने पालिकेच्या कारभाराविरोधात नागरिक संताप (Citizen) व्यक्त करीत आहेत. 


गटारात पडण्याच्या घटनांमध्ये वाढ : 


गेले कित्येक दिवस अशा प्रकाराच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. अनेकदा तरूण मुलं नाही तर लहान मुलंही गटारात पडताना दिसतात. म्हातारी लोकंही अनेकदा अशा घटनांचे बळी होताना दिसत आहेत. तेव्हा अशा या प्रकारांमुळे पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातच नाही तर गावाच्या भागातही असे अनेक प्रकार होताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या लहान मुलांनी आणि विशेषत; वयस्कर मंडळींनी काळजी घेणे आवश्यक ठरले आहे. महानगरपालिकाही याकडे दुर्लक्ष करताना दिसते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नागरिकांनी याबद्दल संताप व्यक्त केला आहे.