प्रथमेश तावडे,  झी मीडिया, वसई : सध्या अनेकजण मोबाईवर गेम खेळत असतात. मात्र, गेम खेळताना ऑनलाईन फसवणूक झाली. बँक खात्यातून दोन लाख रुपये उडाले. ऑनलाईन फसवणुकीमुळे एका 18 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली आहे. नालासोपारा येथे ही धक्कादायक  घटना घडली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आईच्या मोबाईलवर गेम खेळत असताना चुकून एक लिंक ओपन झाली आणि सायबर भामट्यांनी दोन लाख रुपये लंपास केले. ही गोष्ट वडिलांना कळली तर ते रागावतील या भीतीपोटी तरुणाने विषप्राशन करून आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले आहे. आत्महत्या केलेला तरुण हा अकरावी इयत्तेत शिकत होता.


कॉलेजला सुट्टी पडल्याने गेम खेळण्यासाठी त्याने आईचा मोबाईल घेतला होता. हा मोबाईल वडिलांच्या बँक खात्याला जोडलेला होता. गेम खेळत असताना त्याला एक फसवी लिंक आली होती , या लिंक वर क्लिक केल्यानंतर सायबर भामट्यानीं बँक खात्यातून दोन लाख रुपये चोरले. वडिलांना ही गोष्ट समजली तर ते ओरडतील, मारतील या भीतीने तरुणाने कीटकनाशक प्राशन केले.  थोड्या वेळानंतर त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला कुटुंबीयांनी एव्हरशाईन येथील खाजगी रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद आचोळे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


जे मोबाईल बँक खात्याशी लिंक आहेत असे मोबाईल शक्यतो पालकांनी मुलांकडे देणे टाळावे, मुलांना मोबाईल देताना काळजी घ्यावी. तसेच बँक खाते ॲप ला पासवर्ड फेस आयडी व लॉक ॲप वापरावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. 


ब्राऊन शुगरची विक्री करणाऱ्या महिलेला अटक; डोंबिवली पोलिसांची  कारवाई


कल्याणच्या कचोरे गाव,हनुमान नगर परिसरात सलमा शेख ही महिला अंमली पदार्थाची बेकायदेशीरपणे विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार डोंबिवली टिळक नगर पोलिसांनी एक विशेष पथक तयार करून ही महिला ज्या ठिकाणी अंमली पदार्थाची विक्री करत होती, त्या ठिकाणी छापा मारला .त्यावेळी सलमा शेख कडे जवळजवळ साडेपाच लाखाचे १०४ ग्राम वजनाचे ब्राऊन शुगर आढळून आले. पोलिसांनी तात्काळ सलमाला ताब्यात घेत तिच्याकडे असलेला अंमली पदार्थाचा साठा जप्त केला. दरम्यान कल्याण परिसरातील अतिशय गजबजलेल्या वस्तीत इतक्या बिन बोभाट बेकायदेशीरपणे ब्राऊन शुगरची विक्री होत असेल तर कुठेतरी हे पोलिसांचे अपयश आहे काय अशी देखील चर्चा सुरू आहे.