पुण्यात मृत्यूचा थरार, ओव्हरहेड वायरचा धक्का लागून तरूण जळाला
पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : पुण्यातून एक अतिशय धक्कादायक बातमी...पुणे रेल्वे स्थानकात मृत्यूचा थरार पाहायला मिळाला. ओव्हरहेड व्हायरचा धक्का लागून एक तरूण अक्षरश: जळाला. या दुर्घटनेत हा तरूण 70 ते 80 टक्के भाजलाय. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर ही घटना घडली.
पुणे रेल्वे स्थानकात एक धक्कादायक घटना घडलीय. आत्महत्येचा प्रयत्न करणारा एक तरूण ओव्हरहेड वायरचा धक्का लागल्यानं अक्षरश: जळालाय. आता ही दृष्य पाहा. हा तरूण प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर थांबलेल्या गोरखपूर एक्स्प्रेसच्या टपावरून चालतोय. त्यानं खाली उतरावं म्हणून लोक आरडाओरड करतायेत. मात्र त्यानं कुणाचंही ऐकलं नाही. तो चालतच राहिला आणि पुढच्याच क्षणी स्फोट व्हावा तसा मोठा आवाज झाला. ओव्हरहेड व्हायरचा धक्का लागून तो खाली कोसळला.
पुन्हा एकदा पाहा, हा तरूण कशाप्रकारे आपल्या जिवाशी खेळत होता. खरं तर आत्महत्येसाठीच त्यानं हे पाऊल उचललं होतं. स्टेशनवरील कर्मचा-यांनी त्याला एक्स्प्रेसच्या टपावर जाण्यापासून दोन वेळा रोखलं. मात्र नजर चुकवून तो टपावर चढलाच, आणि अवघ्या काही सेकंदात लाकडाच्या ओंडक्याप्रमाणे जळाला. तुम्हीही असं काही करणार असाल, तर सावधान. हे भलतं धाडस जीवावर बेतू शकतं.