Nashik Crime News : नाशिकमध्ये मुळशी पॅटर्न चित्रपटाप्रमाणे थरारक घटना घडली आहे. नाशिक शहरामध्ये गुन्हेगारी कमी होताना दिसत नाही मागील काही महिन्यांमध्ये सर्रास भर दिवसा भर चौकात खुनाच्या घटना घडत आहे.  ज्यांचा खून होतोय ते देखील आणि जे खून करताय ते देखील अगदी कमी वयाचे म्हणजेच 20 ते 22 वयोगटातील युवक असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आले आहे. नाशिक शहरातील सिडको परिसरात मागील आठवड्यात तीन खुनाच्या घटना घडल्या होत्या त्यातच आत्ता पुन्हा एका बावीस वर्षीय भाजी विक्रेत्या युवकाचा सहा युवकांनी अवघ्या 12 सेकंदात 27 वार करत थरारक पद्धतीने खून केल्याची घटना घडली आहे. अंबड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन आठवड्यात तब्बल चार खुनाच्या घटना घडल्या आहेत.


मारहाण करुन व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा सगळा प्रकार घडला आहे शहरातील शिवाजी चौक येथील आहे. या हत्ये मागील एक धक्कादायक वास्तव आता समोर आले आहे. संदीप आठवले असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने मारेकरी असलेल्या ओम पवार उर्फ ओम्या खटकी या युवकाला नवीन नाशिक परिसरातील पाथर्डी फाटा परिसरात आपल्या काही साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली होती आणि त्याचा व्हिडिओ काढून तो instagram वर अपलोड केला होता. या सगळ्या प्रकरणाचा राग ओम पवार उर्फ ओम्या खटकी या युवकाच्या डोक्यात होता आपली सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी झाली हा राग मनात धरून टप्प्यात येतात संदीपचा बदला घ्यायचा असे त्याने ठरवले.


12 सेकंदात 27 वार


गुरुवारी जुने सिडको परिसरातील शिवाजी चौक भाजी मंडई समोर जेव्हा संदीप आठवले हा त्याच्या भावासोबत पाणीपुरी खाण्यासाठी आला त्यावेळी दबा धरून बसलेल्या ओम आणि त्याच्या साथीदारांनी क्षणाचाही विलंब न करता संदीप वर हल्ला चढवला हा हल्ला इतका जबर होता की अवघ्या 12 सेकंदात या चार हल्लेखोरांनी संदीप वर 27 वार केले. काही समजायच्या आतच ही सगळी घटना घडल्याने जुने सिडको शिवाजी चौक भाजी मंडई परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. 


हत्येचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद


दरम्यान ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालीये सीसीटीव्ही कॅमेरा दिसणाऱ्या दृश्यांमधून तो सगळा प्रसंग किती भयानक होता हे लक्षात येते. त्याहूनही भयावह गोष्ट म्हणजे अशी खुनातील आरोपी ओम पवार उर्फ ओव्या खटकी याने खून केल्यानंतर एक व्हिडिओ काढला आणि तो व्हिडिओ थेट इंस्टाग्राम स्टेटसला ठेवत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे गुन्हेगारांचं बळ कुठपर्यंत वाढला आहे हे या कृतीतून दिसून येत. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले तर यामधील एक तरुण अल्पवयीन आहे.