पराग ढोबळे, झी मीडिया, नागपूर : पोलीस पकडण्याची भीतीनं आरोपीने तिसऱ्या मजल्यावरून उडी घेतली आणि त्याचा मृत्यू झाला आहे. भितीमुळे याचा जीव गेला आहे. नागपूरमध्ये (Nagpur) ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. तर, मृत तरुणाच्या नातेवाईकांनी या प्रकारासाठी पोलिसांना जबाबदार धरले आहे (Crime News). 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इम्रान कट्टा उर्फ  मोहम्मद इम्रान शेख इरफान असं मृत तरुणाचे नाव आहे. नागपूर ग्रामीणमध्ये देवलापर पोलीस स्टेशन अंतर्गत गुरांच्या अवैधरित्या वाहतूक प्रकरणात इम्रानवर गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात पोलिस आरोपी इम्रानला ताब्यात घेण्यासाठी गेले होते. 


स्थानिक कपिल नगरच्या हद्दीतील  कॉलनी परिसरात इम्रान राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याचा घरी पोहचताच आरोपी इम्रानने भीतीपोटी तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारल्याचं पोलिसांचे म्हणणं आहे. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने शासकीय रुग्णलयात दाखल करण्यात आले. उपचरा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. 


पोलिसांनी मारहाण केल्यानंतर धक्का दिला यामुळे तो तिसऱ्या मजल्यावरुनपडल्याचा आरोप इम्रानच्या पत्नीने केला आहे. कपिलनगर पोलिसांनी या प्रकरणात चौकशी करू दोषींवर कारवाई करणार असल्याचे पोलीस उपायुक्त श्रवण दत्त यांनी सांगितले. या घटनेमुळे एक खळबळ उडाली आहे.