बुलढाणा : बँक खात्याला आधार लिंक केल्याशिवाय कर्जमाफीची रक्कम मिळणार नाही, असा खोटा दावा करुन शेतक-यांच्या खात्यातील रक्कम परस्पर लंपास केल्याची घटना बुलढाण्यात घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खामगाव तालुक्यातील घारोड गावातील भागवत आत्माराम साबळे हा बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक सेवा प्रतिनिधी असून यानं शेतक-यांच्या खात्यातील पैश्यांवर डल्ला मारलाय. 


बँकेला आधार लिंक केल्याशिवाय कर्जमाफीचे पैसे मिळणार नाहीत असं सागूनं भागवत साबळे यानं अनेक शेतकरी ग्राहकांच्या बाटोंचे ठसे घेतले तसंच ट्रान्सफर फॉर्मवर अनेक गावांतून खातेदारांच्या सरह्या घेतल्या. 


तुमचे खाते आता आधारलिंक केले जाईल आणि तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असं त्यानं शेतक-यांना सागंतिलं. तसंच  Paytm सह विविध नेट बँकिगची माहिती सांगून खातेदारांची दिशाभूल ही केली. 


अशाप्रकारे भागवत साबळे यानं खातेदारांच्या खात्यातून लाखो रुपये स्वत:च्या आणि आपल्या नातेवाईकांच्या खात्यांवर जमा केले. 


गावातील काही नागरिक बँकेच्या खामगाव शाखेत पासबुक प्रिंट करायला गेले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला यानंतर नागरिकांनी हिवरखेड पोलीस ठाण्यात तक्कार दाखल केलीय.