अंबाबाई मंदिरात पुन्हा एकदा अभूतपूर्व गोंधळ
कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पुन्हा एकदा अभूतपूर्व गोंधळ झाला आहे. श्रीपूजक हटावच्या मागणीसाठी अंबाबाई भक्त मंडळाच्या सदस्यांनी मंदिर गाभाऱ्यात जाऊन निदर्शनं केली. इतकंच नव्हे तर मंदिर गाभाऱ्यात नियमापेक्षा जास्त बसलेल्या पुजा-यांना गाभा-यातून बाहेरही काढलं. त्याच बरोबर मंदिरातल्या पुजा-यांना सुबुद्धी दे असं साकडंही देवीसमोर घातलं.
कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पुन्हा एकदा अभूतपूर्व गोंधळ झाला आहे. श्रीपूजक हटावच्या मागणीसाठी अंबाबाई भक्त मंडळाच्या सदस्यांनी मंदिर गाभाऱ्यात जाऊन निदर्शनं केली. इतकंच नव्हे तर मंदिर गाभाऱ्यात नियमापेक्षा जास्त बसलेल्या पुजा-यांना गाभा-यातून बाहेरही काढलं. त्याच बरोबर मंदिरातल्या पुजा-यांना सुबुद्धी दे असं साकडंही देवीसमोर घातलं.
श्री पूजकांनी देवीची चुकीच्या पद्धतीनं बांधलेली पूजा आणि शाहू महाराज यांनी १९१३ मध्ये काढलेल्या वटहुकुमाबद्दल, श्री पूजकांनी केलेल्या चुकीच्या पत्रकबाजीमुळे हा वाद चिघळला आहे. प्रशासनानं दहा दिवसांत पुजारी हटाव भूमिकेबद्दल निर्णय घ्याव अन्यथा मंदिराचे सर्व दरवाजे बंद करुन पुजा-यांना प्रवेश बंदीचा इशारा अंबाबाई भक्तांनी दिला आहे.