हा आरोपी-अधिकारी खडसेंना द्यायचा गोपनीय माहिती
याविषयी त्यावेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी तक्रार केली होती.
नवी मुंबई : आरोपी असलेल्या पोलीस अधिकारी अभय कुरूंदकर हा, तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांना गोपनीय माहिती देत होता, याविषयी त्यावेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी तक्रार केली होती.
अश्विनी गोरे प्रकरणातील संशयित आरोपी
अभय कुरूंदकर हा सहाय्यक पोलीस अधिक्षक अश्विनी गोरे-बिंद्रे बेपत्ता प्रकरणातील संशयित आरोपी आहे. २०१३ मध्ये या विषयीची माहिती पोलिस महासंचालकांना देण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे.
एकनाथ खडसे याविषयी म्हणतात...
माजी महसूल मंत्री आणि याविषयी म्हणतात, मी विरोधीपक्ष नेतेपदी असताना, राज्यभरातील अनेक पोलीस अधिकारी संपर्कात होते, कुरूंदकर त्यापैकी एक असण्याची शक्यता आहे, आणि पत्र लिहिण्याचा जो विषय आहे, त्यात मला असं वाटतं की, तत्कालीन अधीक्षक दिलीप सावंत आणि कुरूंदकर यांच्यातील अंतर्गत वादातून सावंत यांनी पोलीस महासंचालकांना तक्रारीसाठी पत्र लिहिले असावे, असं खडसेंनी म्हटलं आहे.