मुंबई : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सातारा या ठिकाणी होत आहे या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके खेळणार नसल्याचं त्यांनी जाहीर केले . यंदा अभिजीत कटके महाराष्ट्र केसरी खेळणार नाही. दोन वेळा उप महाराष्ट्र केसरी आणि एकदा महाराष्ट्र केसरी असणारा पैलवान यंदा आखाड्यात उतरणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2017 साली भूगाव येथे पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अभिजीत कटके याने महाराष्ट्र केसरीची गदा किरण भगतला पराभूत करुन जिंकली होती.


महाराष्ट्र केसरीचा मान त्याला मिळला होता. 2018 साली जालना येथे झालेल्या स्पर्धेत बालारफीक शेखने अभिजीत कटकेचा अंतिम सामन्यात केला होता पराभव.



यावर्षी अभिजीत कटके महाराष्ट्र केसरी खेळणार नसल्याने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची तयारी तालमीतील मुलांकडून तो करून घेतोय. याबाबत अभिजीत कटके बरोबर बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी.