नागपूर : मुंबईतले भाजप आमदार अमित साटम यांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याची घटना ताजी असतानाच, आता नागपुरातही तशीच घटना घडली आहे. नागपूर महापालिकेतले ज्येष्ठ भाजप नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पोलीस कर्मचा-यांना शिवीगाळ केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र संबंधित पोलिसांना एका कार्यकर्त्याला मारहाण केली, त्यात  त्याचे डोके फुटले, मारहाण करणारा पोलीस दारू पिऊन होता, असा आरोप भाजप नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केला आहे. तुम्ही क्राम्प्रमाईज करा नाहीतर, आम्ही तुमचा व्हिडीओ व्हायरल करू अशी धमकी पोलिसांनी आपल्याला दिल्याचं भाजप नगरसेवक तिवारी यांनी म्हटलं आहे.


शुल्लक वैयक्तिक कारणावरून गणेशपेठ पोलिसांना तिवारी यांनी शिवीगाळ केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, पोलीस आणि भाजप नेते या प्रकरणी दयाशंकर तिवारी यांच्यावर काय कारवाई करतात, तसेच संबंधित मारहाण करणारा पोलिस दारूच्या नशेत असेल तर त्याच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.