ABVP Lotangan Aandolan in  Abasaheb Garware College  : पुण्यातील नावाजलेल्या महाविद्यालयांपैकी एक असलेल्या आबासाहेब गरवारे महाविद्यालात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाविद्यालयाने लोटांगण आंदोलन केलं. महाविद्यालयातील एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निकालात मोठा घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय आहे प्रकरण? 
एम. ए. जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशन विभागात 2021-22 या शैक्षणिक वर्षात द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्किल अँड डेव्हलपमेंट पार्ट- 2 च्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण 50 पैकी भरणे अपेक्षित होते. पण महाविद्यालयाने ते 25 पैकी भरून विद्यापीठाला पाठवले. याचाच परिणाम असा की त्या विद्यार्थ्यांचा अंतिम सत्राचा निकाल अनुत्तीर्ण असा आला.  



यामध्ये जे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. कारम बहुतेक विद्यार्थांना सारखेच गुण मिळाले आहेत. महाविद्यालय प्रशासनास वेळोवेळी याबाबत विचारणा करण्यात आली होती मात्र कोणतीही हालचाल पाहायला मिळाली नाही. आज सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन करण्यात आलं. 


महाविद्यालय प्रशासनाकडून 19 डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यांचे निकाल लावण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले. जर दिलेली ग्वाही जर महाविद्यालयाने पाळली नाही तर 20 डिसेंबरला प्रचार्यांच्या कक्षाला टाळा ठोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी दिला आहे.