मुंबई : सिंचन घोटाळा प्रकरणी एसीबीने आज ७ नवे गुन्हे दाखल केले आहेत. विदर्भ सिंचन महामंडळाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर हे गुन्हे नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेत. मोखाबर्डी, घोडाझरी, नेरला, असोलामेंढा, गोसेखुर्द या प्रकल्पातील कालव्यांच्या कामात निविदा प्रक्रियेत नियमबाह्य काम करणे, कर्तव्यात कसूर, निविदेचं अद्ययावतीकरण करताना नियमांचटं उल्लंघन, निविदेत नियमबाह्य गोष्टींचा समावेश, काम मिळालेल्या कंत्राटदार फर्मची रितसर नोंदणी नसतानाही त्यांना निविदा प्रक्रियेत सहभागी करणे असे आरोप ठेऊन या अधिकाऱ्यांना आरोपी बनवण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे आरोपी बनवण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये विदर्भ सिंचन महामंडळाच्या तत्कालीन मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, विभागीय लेखा अधिकारी अशा मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.