रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर एक विचित्र अपघात घडलाय... यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरची वाहतूक ठप्प झालीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चिपळूण जवळच्या कामथे धरणाजवळ बंद पडलेली एसटी दुरूस्त करण्याचं काम एसटी कर्मचारी करत होते. त्याचवेळी कोळशानं भरलेला ट्रक एसटी कर्मचाऱ्यांवर कोसळला. 


या कोळशाच्या ढिगाऱ्याखाली दोन एसटी कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त केली जातेय. या अपघातामुळं मुंबई गोवा महामार्गावरची दोन्ही बाजूची वाहतूक दोन तासांपासून ठप्प पडलीय.