Mumbai Goa National Highway Accident  : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai Goa National Highway) माणगाव येथे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे.(Mangaon Accident )  कार आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे, या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच वर्षांचा जखमी झालेल्या मुलाचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाला. अपघातातील मृतांचा आकडा 10 झाला आहे. (Raigad Accident 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रक रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येत असताना कार जोरदार धडकला. यात कारमधील लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला पाच पुरुषांचा समावेश आहे. माणगावपासून जवळच रेपोली इथं पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. माणगाव जवळील रेपोली येथील अपघातात बचावलेल्या 5 वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला आहे. भव्य निलेश पंडित असे या मुलाचे नाव आहे. त्याच्यावर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुुरु होते. अपघातातील मृतांचा आकडा पोहोचला 10 वर पोहोचला आहे. कारमधून हे सर्वजण गुहागर तालुक्यातील हेदवी इथे निघाले होते.




 


गोरेगाव पोलीस तातडीने अपघात स्थळी दाखल झालेत. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदत कार्य सुरु केले आहे. या अपघातात जखमी झालेल्या मुलाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.