नाशिक : नाशिक मुंबई महामार्गावर वाडीवऱ्हे गावाजवळ लग्नाच्या वऱ्हाडाला घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर ४० जण जखमी झालेत. गोपाळ रमेश पवार नावाचा तरूण मृत झाला तर कार्तिक दीपक माळी असं मृत बालकाचं नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाथर्डी गावात लग्नासाठी हे वऱ्हाड निघालं होतं. मुंबई आग्रा महामार्गावर चालकाचा टेम्पोवरचा ताबा सुटल्यामुळे रस्त्याच्या कडेला टेम्पो पलटी झाला. टेम्पोत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती मिळतेय. विशेष म्हणजे याच टेम्पोत नवरदेव आणि त्याचे कुटुंबियही होते. मात्र अपघातात नवरदेवाला फारशी इजा झालेली नाही.