रायगड : मुंबईकडे परतत असताना मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ स्विफ्ट डिझायर कार आणि कंटनेरची धडक झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या भीषण धडकेत एका 13 वर्षीय मुलीचा करुण अंत झालाय. तर कारमधले इतर पाचजण गंभीर जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 


या अपघातानंतर मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक विस्कळीत झाली होती. खालापूर टोलनाक्यावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती.