बुलडाणा : एसटी बस आणि ट्रक चा अपघात झाला आहे, या अपघातात बसमधील 18 प्रवाशी जखमी झाले आहेत, तर एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 18 लोकं जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बुलडाणा जिल्ह्यातही देऊळगाव राजा बायपास रोडवर एसटी बस आणि ट्रकच्या या अपघातामुळे बसमधील 18 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. तर एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमी प्रवाशांवर देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या अपघातामध्ये 6 प्रवाशी अत्यंत गंभीर परिस्थितीत आहे. त्यामुळे त्या प्रवाशांना तातडीने जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्याण्यात आले आहे.


हा अपघात नक्की कसा झाली याची माहिती अजून तरी समोर आलेली नाही. पोलिस घटनास्थळी पोहोचले आहे, ते घटनास्थळी उपस्थीत लोकांकडून यावर माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.