कोल्हापूर : ही धक्कादायक बातमी आहे कोल्हापूरातून. वारणानगर इथल्या शिक्षक कॉलनीतून कोट्यावधी रुपये लंपास केल्याचा आरोप असणारा आणि सध्या सी.आय.डीच्या अटकेत असणारा सांगलीचा तत्कालीन निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट आणि सह्ययक पोलीस निरीक्षक सुरज चंदनशिवे या दोघांच्या दिमतीला एक व्यक्ती असल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतकच नव्हे तर आरोपी घनवट आणि चंदनशिवे यांना ज्या गाडीतुन पन्हाळा कोर्टात आणण्यात आलं, त्याच सी.आय.डीच्या गाडीतून तो व्यक्ती उतरताना दिसुन आला. सुरवातीला हा व्यक्ती पोलीस असेल म्हणुन सी.आय.डीच्या गाडीत बसला असेल असं वाटल. पण नंतर मात्र घनवट आणि चंदनशिवे यांची हुजरेगीरी करताना हा व्यक्ती कोर्टाच्या आवारात दिसून आला. माध्यमांचे प्रतिनिधी चंदनशिवे यांचा फोटा घेण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी तो चंदनशिवेच्या आडवा तो येत होता. 


एकीकडे सी.आय.डीचे अधिकारी अटक केलेल्या पोलीस अधिका-यांना कोणत्याही पद्धतीच्या व्ही.आय.पी ट्रीटमेंट दिल्या जात नाही असा दावा करत आहेत. मग दुसरीकडं सी.आय.डीच्या गाडीत घनवट आणि चंदनशिवे यांची  हुजरेगिरी करणारा व्यक्ती आलाच कसा हा खरा सवाल आहे. 


झी मिडीयाकडं असलेल्या दृष्य़ामधे तुम्ही पाहू शकता की ज्या गाडीतून या दोघांना पन्हाळा कोर्टात आणण्यात आलं, त्याच गाडीतून हा व्यक्ती आरामात उतरताना दिसून आला. हा व्यक्ती कोण आहे याची कल्पना सी.आय.डीच्या अधिका-यांना नव्हती का ? आणि जर होती तर मग घनवट आणि चंदनशिवे यांच्या गाडीत तो आला कसा असे अनेक प्रश्न आता या घटनेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत.