पिंपरी चिंचवड : मॉर्निंग वॉक करायला गेलेल्या एका ज्येष्ठ नागरिक महिलेवर एका अज्ञात आरोपीने ब्लेडने गळ्यावर वार करून हल्ला केला आहे. ही घटना बुधवारी पहाटे पाचच्या सुमाराला घडली आहे. या घटनेने पुन्हा एकदा संपूर्ण परिसर हादरलं आहे. ज्येष्ठ मंडळी, महिला मॉर्निंग वॉकला जाताना देखील सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या हल्ल्यात रेखा ज्ञानेश्वर गिरमे ही ज्येष्ठ महिला जखमी झाली आहे. रेखा गिरमे वर ब्लेडने वार करून गळ्यातील दागिने लुटण्याचा प्रयत्न हल्लेखोरांनी केला आहे.  या घटनेच्या थोड्या वेळा नंतर रेखा यांच्या घराच्या मागच्या बाजूने एक अज्ञात व्यक्ती संशयास्पदरित्या फिरतांना आढळून आला. तोच व्यक्ती खिडकीमधून पुन्हा पून्हा गिरमे यांच्या घरात डोकावत असल्याचं CCTV फूटेज मध्ये स्पष्ट दिसत असल्याची बाब रेखा यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आली. त्यांनी त्या व्यक्तीला थांबविण्यासाठी प्रयत्नही केला. मात्र त्या व्यक्तीने पुन्हा तिथून पळ काढला. 



हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाल्याने पोलीस आरोपीचा तपास घेत आहेत. महिला मॉर्निंग वॉकला जातानाही सुरक्षित नसल्याचं आढळून आलं आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण आहे.