वाहतूक कोंडीतून पाथर्डी बलात्काराच्या आरोपीचं बेड्यांसह पलायन
पाथर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी बेड्यांसहीत पसार झाल्याची माहिती समोर आलीये. अहमदनगरमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत त्याने पलायन केल्याचे समजते.
अहमदनगर : पाथर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपी बेड्यांसहीत पसार झाल्याची माहिती समोर आलीये. अहमदनगरमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसाचा फायदा घेत त्याने पलायन केल्याचे समजते.
वाहतूक कोंडीत बस अडकल्यावर लघुशंकेचा बहाणा करत आरोपीने बेड्यांसह पोबारा केला.
भैय्या उर्फ मोईन गुलाब शेख हा आरोपी बेड्यांसकट फरार झाला आहे. ही घटना बुधवारी घडली. शेख हा पाथर्डीतल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी असून त्याला सुनावणीसाठी पाथर्डीहून नगर जिल्हा सत्र न्यायालयात नेण्यात आलं होतं. सुनावणीनंतर परतताना कल्याण-विशाखापट्टणम मार्गावरील मेहकरीला पुलावरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होतं. त्याकारणाने मेहकरीजवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
पुरानं वाहतूक ठप्प झाल्याची संधी साधत मोईनने लघुशंकेसाथी जायचे असल्याचे सांगत गाडीतून खाली उतरला. त्यानंतर पोलिसांना झटका देऊन शेखनं बेड्यांसह पलायन केलं. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.