पुणे : शहरातील अनधिकृत झोपड्यांवर शुक्रवारी महापालिकेनं कारवाई केली. या झोपड्या हटवत असताना त्यात राहणाऱ्या गोर गरीबांचं साहित्य जप्त करण्यात आलं. त्यांना अमानुष वागणूक मिळाल्याची तक्रार आहे. कारवाईबाबत जाब विचारत असतानांच भाजप नगरसेविकेला अश्रू अनावर झाले.


या सगळ्यामुळं व्यथित झालेल्या भाजपच्या नगरसेविका राजश्री काळे यांना संताप अनावर झाला आणि त्यांनी महापालिकेत येऊन चांगलाच गोंधळ घातला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरलं. निंबाळकर यांना अतिक्रमण कारवाईबाबत जाब विचारत असतानांच राजश्री काळे यांना अश्रू अनावर झाले.