अभिनेता वैभव मांगलेना नाटकाच्या प्रयोगावेळी स्टेजवर भोवळ
भोवळ आल्यामुळे वैभव मांगले स्टेजच्या बाजूला कोसळले.
सांगली: सुप्रसिद्ध मराठी अभिनेता वैभव मांगले यांना शुक्रवारी नाटकाच्या प्रयोगादरम्यान स्टेजवरच भोवळ आल्याचा प्रकार घडला. सांगलीच्या भावे नाट्यगृहात वैभव मांगले यांच्या 'अलबत्या गलबत्या' नाटकाचा प्रयोग सुरु होता. यावेळी रंगमंचावर असतानाच मांगले यांना अचानक भोवळ आली आणि ते स्टेजच्या बाजूला कोसळले. यानंतर वैभव मांगले यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी डिहायड्रेशनमुळे (शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने) भोवळ आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामुळे अलबत्या गलबत्या नाटकाचा प्रयोगही रद्द करण्यात आला.