आर्ची आली आर्ची... पण कशासाठी आली हेच आर्ची विसरली; बीडमधील कार्यक्रमात असा झाला गोंधळ
स्टेजवर आल्यावर आपण कशासाठी आलो हेच आर्ची विसरली. यामुळे काहीसा गोंधळ झाला.
विष्णु बुरगे, झी मीडिया, बीड : सैराट(Sairat) फेम आर्ची(Aarchi) अर्थात रिंकू राजगुरूची(Rinku Rajguru) क्रेझ आजही कायम आहे. आर्चीची एक झलक पाहण्यासाठी प्रेक्षक आजही गर्दी करतात. बीडमध्ये भाजप युवा नेत्याच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजीत करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला रिंकू राजगुरूला आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, स्टेजवर आल्यावर आपण कशासाठी आलो हेच आर्ची विसरली. यामुळे काहीसा गोंधळ झाला.
भाजपचे युवा नेते बाबरी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त वडवणी शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होते. यावेळी अभिनेत्री रिंकू राजगुरूला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावण्यात आले होते. रिंकूची एक झलक बघण्यासाठी या कार्यक्रमाला तुफान गर्दी झाली होती.
स्टेजवर आल्यावर आपण कशासाठी आलो याचा विसरच रिंकूंला पडला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी रिंकूला आठवण करून दिली. मात्र, रिंकूने माईक मध्ये बोलण्यास नकार दर्शवला. मग तिथेच बाबरी मुंडेंना शुभेच्छा देत तिने फोटो काढू असं म्हणत विषय टाळला.