शिव भोजन थाळीसाठी आधार कार्डची गरज नाही- भुजबळ
शिव भोजन थाळीसाठी आधार कार्डची गरज नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले
मुंबई : महाविकास आघाडी सरकारतर्फे महाराष्ट्रातील गोरगरिब जनतेसाठी १० रुपयांत देण्यात येणार आहे. यासाठी आधार कार्ड असणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत होते. पण शिव भोजन थाळीसाठी आधार कार्डची गरज नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. शिव भोजन थाळीसाठी आधार कार्ड लागणार ही माहिती कुठून अली मला माहित नसल्याचे भुजबळांनी म्हटले.
शिवसेनेच्या संकल्पनेतूनच १० रुपयात थाळी ही योजनाही सुरू केली जात असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांच्याकडे असलेल्या अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे आहे. शिव भोजन योजना सध्या मुंबई ते ठाण्यात 30-32 ठिकाणी प्रायोगिक तत्वावर असणार आहे. यामध्ये एक अँप असणार आहे. ही योजना गरिबांसाठी असून सरकारी नोकरांनी फायदा घेऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
समाजातील गरीब वर्गासाठी येत्या २६ जानेवारीपासून राज्यात ही योजना सुरू केली जाणार आहे. यामध्ये मुंबईतील १५ ठिकाणांचा समावेश असेल. १० रुपयात थाळी केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून शहरी भागात ३५ रुपये, तर ग्रामीण भागात २५ रुपये अनुदान दिले जाणार आहे.