बुलढाणा  : रमा प्रकाशनाच्या प्रतिष्ठेच्या आदिशक्ती पुरस्काराने यंदा आमदार भारती लव्हेकर, बँकर योगीनी पोकळेसहं सहाजणींना सन्मानित करण्यात आले. दिनानाथ नाट्यगहृात रंगलेल्या या सोहळ्यात मुंबई महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी लबडे यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पुरस्काराचे यंदाचे आठवे वर्ष आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना या पुरस्काराने गौरवण्यात येते.



व्हॉईस क्लिनिशियन डॉ. सोनाली लोहार, एनकेजीएसबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा हिमांगी नाडकर्णी, ग्राहक पंचायतीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या अनुराधा नरसाळे, वसुंधरा देवधर, शुभदा चौककर आदिंना आदीशक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


यावेळी रमा प्रकाशनचे संपादक प्रकाश कुलकर्णी उपस्थित होते. या पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने उत्तरा मोने यांनी आदीशक्तीचा जागर करणाऱ्या संगीत सोहळ्याचे संयोजन केले होते.