Maharashtra Politics : अनेक दिवसांपासून रखडलेला शिंदे फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार अखेर झाला आहे. भाजप आणि शिंदे गटाचे अनेक आमदार मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत आहेत. असे असताना फक्त शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी झालेल्या अजित पवार यांच्यासह राष्ट्रावदीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मंत्रिमंडळ विस्तारात अखेर महिला आमदाराला स्थान मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे (Aditi Sunil Tatkare) या शिंदे फडणवीस सरकारमधील पहिल्या महिला मंत्री ठरल्या आहेत. 


शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रीमडळात एकही महिला मंत्री नसल्याने टीका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर  भाजपकडून (bjp) 9 आणि शिंदे गटाकडून 9 आमदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. 18 पैकी 18 मंत्री हे पुरुषच होते. एकाही महिला आमदाराला मंत्रीमंडळात स्थान न दिल्याने शिंदे फडणवीस सरकारवर सातत्याने टीका केली जात होती. दुसऱ्या मंत्रीमंडळात महिला आमदाराला मंत्रीपद दिले जाईल असे देखील सांगितले जात होत.  


भाजपकडे 12 तर  शिंदे गटाकडे 3 महिला आमदापर 


भाजपकडे एकूण 12 महिला आमदार आहेत. तर शिंदे गटाकडे एकूण तीन महिला आमदार आहेत. दुसऱ्या मंत्रीमंडळ देखील या पैकी एकाही महिलेला महिलेला मंत्रीपद देण्यात आलेलं नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात  
राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे थेट मंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. भाजप, शिंदे गटातील महिला आमदारांना कधी संधी मिळणार? असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. 


कोण आहेत अदिती तटकरे


अदिती तटकरे या राष्ट्रवादीचे दिग्गज नेते सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. एका टर्ममध्ये त्या दुसऱ्यांदा मंत्री झाल्या आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात पहिल्यांदाच आमदार झालेल्या अदिती सुनील तटकरेंकडे उद्योग, पर्यटन, क्रीडा ,खनिकर्म ,फलोत्पादन आणि माहिती व जनसंपर्क या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी राज्यमंत्री म्हणून सोपवण्यात आली होती. यानंतर आता महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर त्यांचे मंत्रीपद गेले. मात्र, अजित पवार यांच्या बंडखोरीनंतर त्यांनी आता दुसऱ्यांचा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.  


भाजपकडून मंत्रिपदाच्या दावेदार


1. मंदा म्हात्रे – बेलापूर


2. मनिषा चौधरी – दहिसर


3. विद्या ठाकूर – गोरेगाव


4. भारती लव्हेकर – वर्सोवा


5. माधुरी मिसाळ – पर्वती


6. देवयानी फरांदे – नाशिक मध्य


7. सीमा हिरे – नाशिक पश्चिम


8. श्वेता महाले – चिखली


9. मेघना बोर्डीकर – जिंतूर


10. नमिता मुंदडा – केज


11. मोनिका राजळे – शेवगाव


शिंदे गटातील मंत्रीपदाच्या दावेदार


1. यामिनी जाधव – भायखळा


2. गीता जैन, भाजप बंडखोर – मीरा-भाईंदर


3. मंजुळा गावित – साक्री