Majhi Ladki Bahin Yojana 3rd Installment: रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे मानधन कधी जमा होणार असा प्रश्न अर्जदार महिलांना सतावत होता. आता लाडकी बहीण योजनेचा तिसरा हफ्ता कधी बँक खात्यात जमा होणार याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम रायगडमध्ये होत आहे. 29 सप्टेंबर रोजी तिसरा राज्यस्तरीय कार्यक्रम होत आहे. त्याचदिवशी म्हणजे 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात तिसरा हफ्ता जमा होणार आहे. सप्टेंबरपर्यंत आलेल अर्ज यांचे लाभ वितरित करण्यात येतील. या योजनेमुळं 2 कोटी महिलांना लाभ दिले जाणार आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. 29 सप्टेंबर रोजी महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहेत. 


लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस?


लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस जवळ येत आहे. त्यामुळं ज्या महिलांनी योजनेसाठी अर्ज केलेला नाहीये त्यांनी अर्ज करावात असं अवाहन सरकारकडून केलं जातं आहे.  ३० सप्टेंबरपर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहीण अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. महिलांचा अर्ज स्वीकार झाल्यानंतर त्यानंतर तीन महिन्यांचे एकत्रित असे ४५०० खात्यात जमा होणार आहेत. 


दरम्यान, रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकत्रित मानधन बँक खात्यात जमा करण्यात आले होते. 31 जुलैपूर्वी अर्ज सादर केलेल्या बहिणींच्या बँक खात्यावर जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम, प्रत्येकी 3000 रुपये वर्ग करण्यात आले होते. दरम्यान, अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना 01 जुलै, 2024 पासून दर माह रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे.


जुलै 2024 पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात केली होती. दरवर्षी योजनेसाठी 46 हजार कोटीचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. ज्यांच्या कुटुंबाचं एकत्रित उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.