अपघातग्रस्त दुचाकीस्वाराला पाहून आदित्य ठाकरे यांचा ताफा थांबला अन्...; सर्वत्र होतंय कौतुक
Aaditya Thackeray: कोल्हापूर-मुंबई दौऱ्यावरून परतत असताना कराड टोल नाक्याच्या पुढे एका बाईक स्वाराचा अपघात झाला होता. अपघात झाल्याची माहिती मिळताच त्याच्या मदतीसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे धावले.
Aaditya Thackeray: युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या माणूसकीचं पुन्हा एकदा दर्शन झालं आहे. यावेळी रस्त्यावर अपघात झालेल्या एक तरूणाच्या मदतीसाठी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे धावून गेले आहेत. यावेळी आदित्य ठाकरेंनी अपघातग्रस्त व्यक्तीला मदत करत पुढे त्याला उपचारांसाठी पाठवण्यास मदत केली आहे.
कोल्हापूर-मुंबई दौऱ्यावरून परतत असताना कराड टोल नाक्याच्या पुढे एका बाईक स्वाराचा अपघात झाला होता. अपघात झाल्याची माहिती मिळताच त्याच्या मदतीसाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे धावले. यावेळी अपघात ग्रस्त दुचाकी स्वराला त्यांनी अँम्युलन्सची व्यवस्था करून दिली. शिवाय त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात शिवसैनिकांच्या आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने पुढील उपचारासाठी पाठवलं
या दुचाकी स्वाराचा अपघात दुसऱ्या दुचाकी स्वराच्या धडक दिल्यामुळे झाला होता. त्यावेळी स्थानिक पोलिसांच्या मदतीने अपघातग्रस्त दुचाकी स्वाराला आदित्य ठाकरेंनी केलें हे कर्तव्य माणुसकीची दर्शन घडवणारे आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालावर आदित्य ठाकरेंची नाराजी
खरी शिवसेना कोण याचा निकाल अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिला. दरम्यान यावर आदित्य ठाकरे यांनी यावर व्यक्त होताना निर्लज्ज म्हणत संताप व्यक्त केला आहे. लोकशाहीची इतकी निर्लज्ज हत्या यापेक्षा ठरु शकत नाही. हे देशासाठी मोठे संकेत आहे. घाणेरडं, खोक्याचं राजकारण वैध ठरवलं जात आहे. भाजपाला देशाचं संविधान बदलायचं आहे असं आदित्य म्हणाले आहेत.
गेल्या 16 महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेला आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल स्पष्ट झालेला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. यामध्ये शिंदेंची शिवसेना हाच खरा पक्ष असल्याचं स्पष्ट केलंय. शिंदे गटाच्या 16 आमदारांना पात्र ठरवत ठाकरे गटाच्या 14 आमदारांनाही पात्र ठरवलं आहे. अशातच राहुल नार्वेकर यांच्या या निर्णयानंतर आता उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला आहे.