Maharashtra Politics, हिंगोली : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रातील आज पाचवा दिवस आहे. महाराष्ट्रात नांदेडमधून (Nanded) सुरू झालेली भारत जोडो यात्रा आज हिंगोलीत पोहचली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात होत असलेल्या भारत जोडो यात्रेला(Rahul Gandhi bharat jodo yatra) राष्ट्रवादी सह आता ठाकरे गटानेही साथ दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांचे पुत्र आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(former state environment minister Aditya Thackeray) हे देखील या यात्रेत सहभागी झाले. भारत जोडो यात्रेत हे दोन युवराज एकत्र दिसले. महाराष्ट्राच्या राजकारणातील ही लेक्षवेधी घडामोड ठरली आहे.


राष्ट्रवादीचे नेत्यांची राहुल गांधीसह पदयात्रा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, गुरुवारी नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil), राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड(NCP MLA Jitendra Awad) यांनी राहुल गांधीसह पदयात्रेत सहभाग घेतला. 


आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे आणखी काही नेते या यात्रेत सहभागी होणार 


यानंतर आज भारत जोडो यात्रा हिंगोलीत दाखल झाली. यावेळी आदित्य ठाकरेंनी यांनी राहुल गांधीसह या यात्रेत सहभाग घेत पदयात्रा केली. आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठ शिवसेनेचे आणखी काही नेते या यात्रेत सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यासह तब्बल 8 किली मीटर पदयात्रा केली.या दोन्ही नेत्यांमध्ये 30 ते 35 मिनीटे चर्चा झाल्याचेही समजते. 


भारत जोडे यात्रेत महाविकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन 


भारत जोडो यात्रा काँग्रेसची असली तरी महाविकास आघडीचे नेते याच्या माध्यमातून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहेत. महाविकास आघाडीत बिघाडी झाली असून नेत्यांमध्ये मतभेद असल्याची चर्चा देखील रंगली होती. मात्र, या भारत जोडो यात्रेत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सहभाग लक्षवेधी ठरत आहे.