कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक प्रचारासाठी आदित्य ठाकरे मैदानात
...
रायगड : कोकणात सध्या कोकण पदवीधर मतदार संघाच्याच निवडणूकीचे वारे जारेदार वाहू लागले आहेत. शिवसेनेतर्फे ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. संजय मोरे यांच्या विरोधात भाजपासह राष्ट्रवादी काँग्रेसदेखील रिंगणात उतरली आहे.
शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेनेचे युवराज युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे एक दिवसाच्या रायगड दौऱ्यावर आले होते. त्यांनी महाड येथे आयोजीत मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केले. यावेळी कोणत्याही राजकीय पक्षावर टीका करणे आदित्य यांनी टाळले.
यावेळी आदित्य यांनी पुन्हा 'एकला चलोरे' चा नारा देत राज्यात एकहाती सत्ता मिळवण्याचा सूर लावला. त्यासाठी विधानसभेबरोबरच विधानपरीषदेची निवडणूक देखील महत्वाची असल्याचं नमूद केलं. अमित शाह आणि उदधव ठाकरे यांच्या भेटीबाबत आपण तेथे नसल्याचं सांगत आदित्य ठाकरेंनी बोलणं टाळलं.