आदित्य ठाकरेंनी कोणाला फुकट सल्ला देऊ नये, राधाकृष्ण विखेपाटील यांच्या टीकेवर दानवेंचं उत्तर
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी 31 ऑक्टोबर 2022 रोजी पत्रकार परिषद घेतली.
प्रविण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी 31 ऑक्टोबर 2022 रोजी पत्रकार परिषद घेतली. आदित्य ठाकरे यांनी त्या पत्रकार परिषदेत राज्य सरकारने आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांवर बोट दाखवत अनेक प्रश्न शिंदे गटाला केले. त्यांच्या प्रश्नांवर अनेक राजकीय नेत्यांनी आपली मत मांडली. काहींनी तर चक्क त्यांना सल्ले देखील दिले. (Aditya Thackeray should not give free advice to anyone ravsaheb danven reply to Revenue minister Radhakrishna Vikhepatil's criticism nz)
हे ही वाचा - सेक्स रॅकेटचा धक्कादायक प्रकार, 72 वर्षीय वृद्धाला ब्लॅकमेल करत उकळले लाखो रुपये
तर आदित्य ठाकरे यांना खुप काही शिकायचे आहे त्यामुळे त्यांनी कोणाला फुकट सल्ला देऊ नये असे परखड़ मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी व्यक्त केले आहे. विरोधी पक्षनेते आंबदास दानवे यांनी भाजप शिंदे सरकारच्या बसलेल्या कानठळ्या आदित्य ठाकरे उठवणार असे वक्तव्य अंबादास दानवे यांनी केले होते त्यावर राधाकृष्ण विखेपाटील बोलत होते. आपला सल्ला आहे आदित्य ठाकरे यांनी कोणाला सल्ला देउ नये ,तर आंबदास दानवे यांना कोणताही सल्ला देणाऱ नाही त्यांचे कोणीही ऐकत नसल्याचे असे वक्तव्य राधाकृष्ण विखेपाटील यांनी केले आहे.
हे ही वाचा - शिवसेना सोडून शिंदे गटात गेलेले सर्व आमदार नैराश्यात - बाळासाहेब थोरात
त्या परिषदेनंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी तुम्ही कोण, तुमचे वय किती, पक्षांमध्ये किती काम केलं असा परखड सवाल आदित्य ठाकरेंना केला. इतकंच नव्हे तर आदित्य ठाकरेंच्या विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले... जे प्रकल्प आहेत ते तीन साडेतीन महिन्यापूर्वीच महाराष्ट्र बाहेर गेलेले आहेत. त्याला कारणीभूत तेच आहेत, असा आरोप त्यांनी केला.