Aaditya Thackeray on Eknath Shinde :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्याचा आदित्य ठाकरेंनी दौरा केला. शिंदेंचा बालेकिल्ला असणारं ठाणे शहर आदित्य ठाकरे पिंजून काढत आहेत. आदित्य ठाकरे कार्यकर्ते आणि पदाधिका-यांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 


शिंदेंच्या शेतीवरून आदित्य ठाकरे यांचा जोरदार टोला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमावस्या, पौर्णिमेला मुख्यमंत्री शिंदे शेती करायला जातात. रात्रीच्या चंद्राच्या प्रकाशात ते नेमकी कुठची शेती करतात असा खोचक सवाल आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंना केला. आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात येत शिवसेनेच्या शाखांना भेट दिली यावेळी त्यांनी शिंदेंच्या शेतीवरून जोरदार टोला लगावला. शिंदेंच्या गावात जायला रस्ते नाहीत मग 2-2 हेलिकॉप्टर घेऊन कसे जातात असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला. 


दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनावरून आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा


दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनावरून आदित्य ठाकरेंनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. दिल्लीच्या बॉर्डरवर अन्नदात्याच्या विरोधात खिळे लावलेत. त्यांच्यावर ड्रोनमधून अश्रूधूर सोडले जातायत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली होती. स्वामीनाथन यांना भारतरत्न दिला मात्र ज्यांच्यासाठी ते बोलत होते त्यांच्यावर लाठीचार्ज होतोय. त्यामुळे दिल्ली सील करण्यापेक्षा दिल खोलो बात करो असा सल्ला आदित्य ठाकरेंनी दिला आहे.


कोकण आणि मराठवाड्यानंतर बुलढाणा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जनसंवाद यात्रा


कोकण आणि मराठवाड्यानंतर बुलढाणा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जनसंवाद यात्रा दाखल होतेय. 22 आणि 23 फेब्रुवारीला उद्धव ठाकरे बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे एकूण 6 सभा घेणार आहेत. 22 फेब्रुवारीला चिखली,मोताळा, जळगाव जामोद इथे तर 23 फेब्रुवारीला शेगाव, खामगाव,मेहकर या ठिकाणी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत.. शेगाव इथे गजानन महाराज मंदिरात जाऊन उद्धव ठाकरे दर्शन घेणार आहेत.. बुलढाणा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. शिवसेना शिंदे गटात असणारे बुलढाणा मतदारसंघातील विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्याविरोधात उद्धव ठाकरेंनी जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली.