Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी. उद्धव ठाकरे यांच्या एकदिवसीय पीक पाहणी दौऱ्यानंतर आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सुद्धा संभाजीनगर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. 7 आणि 8 नोव्हेंबरला ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे यावेळी संवाद साधण्यासाठी त्यांनी शिंदे गटांच्या दिग्गजांचे तालुके निवडलेत.अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोडमध्ये शेतक-यांशी संवाद साधत आदित्य ठाकरे सभा घेणारेत. तर संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या पैठणमध्ये सुद्धा संवाद साधत सभा घेणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले आहे. मी इथून राजीनामा देतो, तुम्ही वरळीतून राजीनामा द्या. लगेच निवडणूक होऊ द्या, कोण निवडून येतं ते पाहू. दूध का दूध पानी का पानी होऊनच जाऊ दे, असे आव्हान अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी सातत्याने आधी राजीनामे द्या आणि निवडणुकीला जा, असे 40 आमदारांना ठणकावले होते. त्यानंतर सत्तार यांची प्रतिक्रिया आली आहे.  


उद्धव ठाकरे यांनी कंबर कसली 


शिवसेनेतेल्या फुटीनंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह 40 आमदारांना पराभूत करण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कंबर कसली आहे. यासाठी उद्धव ठाकरे यांनी नवा प्लान तयार केल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्लाननुसार ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात बारकाईने आढावा घेण्यात जणार आहे. तसेच तोडीस तोड नेत्यांना बळ देण्याची तयारीही ठाकरे गटाने केल्याचे बोललं जात आहे. 


काय आहे ठाकरेंचा हा नवा ?


एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर त्यांच्यासोबत शिवसेनेचे 40 आमदार त्यांच्यासोबत गेले. त्यामुळे राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपचे नवे सरकार आले. मुख्यमंत्री शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवड झाली. आता या सरकारला तीन महिने झालेत. मात्र, ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. आता ठाकरे यांनी नवा प्लान आखलाय. याचीच चर्चा सुरु झाली आहे.


एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांना शह देण्यासाठी ठाकरे यांनी नवी रणनीती आखली आहे. 40 आमदारांच्या मतदारसंघात नव्या नेतृत्वाला पुढे आणले जाणार आहे. त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून बळ देण्यात येणार आहे.


दरम्यान, शिवसेना युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी काही बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. थेट लोकांमध्ये जात चांगला जनाधार निर्माण केला. आता पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे लोकसभा, विधानसभा, स्थानिक निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांनी उमेदवारीसाठी पदाधिकाऱ्यांची आतापासूनच चाचपणी सुरु केली आहे. त्यानुसार शिवसेना भवनात बैठकाही घेतल्या. पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शनही केले आहे. 


विदर्भातील यवतमाळमधील आमदार संजय राठोड यांना शह देण्यासाठी ठाकरे गट संजय देशमुख यांना पुढे करणार आहे. अशाच प्रकारे अन्य जिह्यातही बंडखोर आमदारांना तोडीस तोड देण्यासाठी तगड्या नेत्यांना ठाकरे गट निवडणुकीच्या मैदानात उतरविणार आहेत. त्यासाठी त्यांनी तयारी सुरु केली आहे.


तर दुसरीकडे आदित्य ठाकरे देखील सातत्याने आक्रमक भूमिका मांडत आहेत. ठाकरे गट शिवसेनेची नव्याने बांधणी करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. आता आदित्य ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरेही दौरा करणार आहेत. पक्षातून फुटलेल्या आमदारांना धडा शिकवण्यासाठी उद्धव ठाकरे तयारीला लागल्याचे बोलले जात आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातील लढाई जिंकण्यासाठी देखील ठाकरे गटाने कंबर कसली आहे.