पुणे : गेल्या काही महिन्यांपासून राज्यात दररोज राजकीय चिखलफेक होतच आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे मात्र यावर कधी थेट भाष्य करत नाहीत. कधी स्टेट ड्राइव्हर तर कधी गुगली अशीच त्यांची उत्तर असतात. आज पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी अशीच गुगली टाकली.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्यात आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पर्यायी इंधन परिषदेतील प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, पुणे शहर ऑटोमोबाईलसाठी प्रसिद्ध असल्यामुळे पुण्यात आज आपण ही परिषद भरवली. ज्या नागरिकांना इलेक्ट्रिक गाडी घ्यायची आहे त्यांच्यासाठी हे आहे. पुणेकरांनी इथे यावं. इथे त्यांना चांगले पर्याय मिळतील. पुणे हे मुख्य केंद्र असून बाकीचे ठिकाण त्यांना फॉलो करतील.


पेट्रोल, डिझेलपेक्षा इलेक्ट्रिकवर खर्च कमी होतो. पुणे, मुंबई, औरंगाबादमध्ये सगळा खर्च आता बसेसवर होईल. राज्यात स्टार्टअप खूप आहेत. आता त्यांना स्केल अप करायचे आहे. महाराष्ट्रात येत्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात चार्जिंग स्टेशन दिसतील." असं ते म्हणाले. 


याच दरम्यान, पत्रकारांनी त्यांना राज्यात पॉलिटिकल प्रदूषण वाढले आहे का? असा प्रश्न केला असता त्यांनी गुगलीच टाकली. राज्यात 'थ्री व्हीलरचं चांगलं चालू आहे' असं हजरजबाबी उत्तर  आदित्य ठाकरे यांनी दिलं.