COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


Kiran Pawaskar on Aditya Thackerays : राज्यात शिवसेनेमध्ये फुट पडल्यानंतर दोन गट तयार झाले आहेत. त्यानंतर ठाकरे आणि शिंदे गटातील नेते एकमेकांनावर कुरघोडी करताना दिसतं आहे.  राज्यातील मंत्र्याचे राजीनामे मागाल तर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे पार्ट्यामधल्या दारू (alcohol) पितानाचे व्हिडीओ दाखवू असा थेट इशारा शिंदे गटातील नेत्याने इशारा दिला आहे. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांचा दारुबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका केली होती. शिंदे गटाचे किरण पावस्कर यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. 



'शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं नाटक बंद करावं'


"ज्यांना नाईट लाईफचं आकर्षण आहे त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं नाटक बंद करावं. आदित्य ठाकरे मिटिंग सुरू असताना दारुचे व्हिडीओ आहे, त्यांच्या पार्ट्यांचे व्हिडीओ आहेत. तुम्हाला किती व्हिडीओ बघायचे आहेत?"अशा शब्दात किरण पावस्कर यांनी टीका केली. (Aditya Thackerays liquor videos Kiran Pawaskar  and Abdul Sattar nmp)



काय आहे नेमकं प्रकरण?


गेल्या आठवड्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पीक नुकसान पाहणीच्या बीड दौऱ्यावर गेले होते. यावेळी बीडमधील रेस्ट हाऊसमध्ये कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासोबत कार्यकर्ते चहा घेत होते. यावेळी जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी चहा नको म्हटले. त्यावर अब्दुल सत्तार यांनी तुम्ही दारू पिता का? असं विचारलं. अब्दुल सत्तारांचा हाच व्हिडिओ काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट केला. त्यानंतर अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मागणी केली. त्यानंतर शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंना उत्तर देण्यात आले.