आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर, बंडखोर आमदार सुहास कांदे देणार निवेदन
Shiv Sena Crisis : राज्यातील सत्ता संघर्षानंतर युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) नाशिक दौऱ्यावर येत आहेत.
मनमाड, नाशिक : Shiv Sena Crisis : राज्यातील सत्ता संघर्षानंतर युवासेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. एकनाथ शिंदे गटात दाखल झालेले आमदार सुहास कांदे यांच्या मतदार संघातील मांमदमध्ये शिवसंवाद मेळावा घेऊन शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. सकाळी 11 वाजता होणाऱ्या या मेळाव्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. यावेळी सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांनी एक निवदेन देण्याची शक्यता आहे. तसे संकेत त्यांनी दिले आहेत.
मात्र दुसरीकडे आमदार सुहास कांदे हे देखील हजारो कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन हिंदुत्व तसेच काही प्रश्नाबाबत त्यांना निवेदन सादर करणार असल्याचे पत्र त्यांनी पोलिसांना दिले आहे.दरम्यान कांदे यांनी आदित्य ठाकरे ज्या मार्गाने येणार आहेत, त्या ठिकाणी विविध प्रश्न विचारणारे फलक लावले आहेत. या फलकांची जोरदार चर्चा होत आहे. शिवसंवाद मेळाव्यानिमित्त ठाकरे - आणि शिंदे गट आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.