अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती: कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सरकारकडून वारंवार सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन केले जात असतानाच अमरावतीत मात्र प्रशासनाकडूनच या आदेशाला हरताळ फासण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा या गावात हा प्रकार घडला. येथील १६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना एकाच रूग्णवाहिकेतून त्यांना उपचारासाठी चांदुर बाजर येथे उपचारासाठी कोंबून नेण्यात आले. विशेष म्हणजे यामध्ये लहान मुले व वृद्ध व्यक्तींचाही समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोनाचे ६९६५२ नवे रुग्ण; ९७७ जणांचा मृत्यू

सध्या अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्य झपाट्याने वाढत असून हा आकडा आता चार हजाराच्या वर गेला आहे. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण हे आढळत आहे. या १६ रुग्णांना चांदुर बाजार येथे आणल्यानंतर त्यातील चार कोरोना रुग्णांना उपचारासाठी अमरावती येथील पंजाबराव देशमुख रुग्णालयात नेण्यात आले. चांदुर बाजार येथील कोविड रुग्णालयात नेल्यानंतर तेथे डॉक्टरही उपलब्ध नसल्याचा आरोप रुग्णांनी केला आहे. तर अनेकांना कोरोनाची कुठलीही लक्षणे नसल्याचे दावा काही रुग्णांकडून करण्यात आला आहे.


आनंदाची बातमी: कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावला; पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट


दरम्यान, बुधवारी राज्यात कोरोनाचे १३,१६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ३४६ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६,२८,६४२ एवढी झाली आहे. तर राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ४,४६,८८१ एवढी झाली आहे. राज्यातला रुग्ण बरे होण्याचा दर ७१.०९ टक्के एवढा झाला आहे.