धुळे जिल्ह्यात तब्बल ३४ दिवसानंतर पावसाची सर्वत्र हजेरी
जिल्ह्यात तब्बल 34 दिवसानंतर पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. जिल्ह्यात १४ जुननंतर पावसाने दांडी मारली होती. मध्यंतरी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. मात्र सर्वत्र पाऊस पडत नाही म्हणून जिल्ह्यात दुबार पेरणीची वेळ आली होती.
धुळे : जिल्ह्यात तब्बल 34 दिवसानंतर पावसाने सर्वत्र हजेरी लावली आहे. जिल्ह्यात १४ जुननंतर पावसाने दांडी मारली होती. मध्यंतरी जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली होती. मात्र सर्वत्र पाऊस पडत नाही म्हणून जिल्ह्यात दुबार पेरणीची वेळ आली होती.
मंगळवारी जिल्ह्यातील धुळे, साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यात सर्वत्र पाऊस पडला. कुठे तुरळक तर कुठे मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांना जीवनदान मिळालं आहे. यामुळे शेतकऱ्यांचा थोडा दिलासा मिळाला आहे.